Jan 18, 2008



मिशन पॉसिबल या सदरात आपले स्वागत. जागतिकीकरणाच्या युगात नव्या कल्पना, नवा विचार आणि नवा संवाद करत स्वतःच्या विकासाबरोबरच आपल्या समाजासाठीही काही करू इच्छिणार्‍या युवक-युवतींसाठी हे सदर आहे.

दिनांक ५ जानेवारीपासून हे सदर दैनिक लोकसत्ता मध्ये चतुरंग पुरवणीत सुरू झाले आहे. दर पंधरवड्यात एक लेख या सदरात वाचायला मिळेल. हे लेख http://www.loksatta.com/daily/20080105/ch09.htm येथे वाचायला मिळतील.

मिशन पॉसिबल हा उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे---
दैनिक लोकसत्ता, अमेय फाऊंडेशन, संपर्क , एक गाव एक संगणक, चरखा मिडिया नेटवर्क आणि आशा फॉर एज्युकेशन.

या सदराद्वारे युवक-युवतींचा परस्पर संवादासाठी माध्यम म्हणून हा ब्लॉग उपलब्ध करण्यात आला आहे. याद्वारे होणार्‍या विचारमंथनातून तरूण पिढीतून नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी मदत आणि मार्गदर्शन केले जाईल.